धारूर

भविष्यात धारूर ‘हरीत शहर’ म्हणून नावा रूपाला येणार : खा. प्रितमताई मुंडे

हरीतपट्टा योजनेचा खा.मुंडेंच्या हस्ते शुभारंभधारूर : धारूर शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होणार्‍या पन्नास लक्ष रुपयांच्या हरीतपट्टा योजनेतील कामाचा शुभारंभ जिल्ह्याच्या खा.प्रितमताई मुंडे यांचे हस्ते करण्यात आला. या योजनेतून लागवड होणार्‍या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदारावर असणार आहे. त्यामुळे या वृक्ष संवर्धनातून शहराचे रुप पालटणार आहे. पर्यावरणाच्या संगोपनातुन येणार्‍या काळात आपल्याला व येणार्‍या पिढीला होणारा त्रास कमी करण्यास मदत होणार आहे. उद्याच्या उज्वल व समृद्ध भविष्यासाठी पर्यावरणाचे संगोपन राखून त्याची योग्य निगा राखणे आवश्यक असल्याचे मत यावेळी खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केले.
धारूर नगर परीषदेच्या वतीने राज्य शासनाचे वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून शहरात पन्नासलक्ष रुपयाचे हरीतपट्टा योजनेचे शुभारंभ जिल्ह्याच्या खा.प्रितमताई मुंडे यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, मुख्याधिकारी नितिन बागूल, उपनगराध्यक्ष मिनाक्षी गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की जिल्ह्यातील राजकीय, बिगर राजकीय घडामोडींपासून बाजूला व विकासाला प्राधन्य देणारे धारूर शहर आहे. कोरोनामुळे सहा महिण्यापासून जनसंवाद कमी झाला, त्यामुळे व्हिडीओ कान्फर्सवरच संपर्क साधावा लागत आहे. मात्र त्यामध्ये मजा नाही, सभेमध्ये उत्साहदायक वातावरण असते, सहा महिण्यांनंतर प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी आज मिळाली, असे सांगत कोरोनाने बरचं शिकवलं, निसर्गाची अवहेलना करणारे माणसाला त्यांनेच चाप बसवला, नविन शिकायची संधी मिळली या परिस्थीतीने पर्यावरणाच संगोपन करण्याच शिकवल पर्यावरणाच संवर्धन झाले तर आपल्या पुढच्या पिढीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, खर्‍या अर्थाने नवीण्यपूर्ण हरीतपट्टा ही संकल्पना यामधून शहराचं परिवर्तन होणार आहे, वृक्ष संगोपन करणे आवश्यक आहे. या मधून हे शहर आदर्श उदाहरण सर्वत्र ठरू शकतो, कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले असून निसर्गाचा समतोल राखण्याची जाणीव देखील या काळात आपल्याला झाली आहे. निसर्गाचे संगोपन केले,त्याची योग्य निगा राखली तर येणार्‍या काळात आपल्यासह आपल्या पिढीला होणारा त्रास कमी होईल. हरित पट्ट्याची निर्मिती हा उपक्रम नाविन्यपूर्ण व अभिनव असून भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हंटले. धारूर नगर परिषद राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे धारूर शहर बीडसह राज्यात आदर्श ठरेल, या उपक्रमा अंतर्गत करण्यात येणार्‍या वृक्षारोपणाची पुढील तीन वर्षे निगा राखण्यासाठी धारूरकर वृक्षांना कुटुंबातील सदस्य या दृष्टिकोनातून बघत आहेत हे कौतुकास्पद असून येणार्‍या काळात धारूरची ओळख हरित शहर अशी निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी हरीत शहर योजनेची माहिती सांगून शहरातील विकास कामाची माहिती दिली.या कर्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब गायकवाड यांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक संतोषबप्पा सिरसट, बाळासाहेब खामकर, सुरेश लोकरे, बिभिषण गायकवाड, चोखाराम गायसमुद्रे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला उदयसिंह दिख्खत, रोहित हजारी, विक्रांत हजारी, दत्तात्रय धोत्रे, नगरसेवक शेख गफार भाई बालाजी चव्हाण, सुनील शिनगारे,बालाजी जाधव, मोहन भोसले, बाजार समितीचे महादेव तोंडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री असताना पंकजाताईंनी धारूर शहराला
20 कोटींचा निधी दिला – नगराध्यक्ष हजारी
धारुर शहराची विकासाकडे वाटचाल सुरु आहे, नगर परिषदेच्या माध्यमातुन विविध विकास कामे शहरात प्रगतीवर आहेत, राज्यात भाजप सरकार असताना शहराला मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे. माजी मंत्री पंकजाताईंनी मंञी असताना 20 कोटी रुपयांचा निधी धारुर शहराला दिला, असे यावेळी डॉ. स्वरूपसिंह हजारी म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!