माजलगाव राजकारण

राष्ट्रवादी भाजपची कावड घेऊन नेमके दादा चालले कुठल्या तीर्थक्षेत्राला ? ; सत्तांतरानंतर आमदार सोळंके यांची देहबोली पाठोपाठ भाषाही बदलली

वेगळ्या सुतोवाचाने भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमित.!

माजलगाव – सत्तांतरानंतर माजलगावचे आ. प्रकाश सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील अनेक महिन्यापासून मतदार संघात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात 17 तारखेला होणाऱ्या आंदोलना बाबत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना आ. सोळंके यांनी जनतेच्या निर्णयाच्या कुबड्या हाती घेऊन “मन की बात बोलून दाखवली” ती म्हणजे भाजपा सहित शिंदे गटाचा पर्याय जनतेच्या इच्छेखातर खुला असल्याचे बोलून भविष्यातील राजकारणाचे सुतोवाच केल्याने एकच खळबळ उडाली असून मातृपक्ष असलेला भाजप आणि पितृपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची कावड घेऊन आ. सोळंके नेमक्या राजकारणातील कोणत्या तीर्थक्षेत्राला निघाले असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश सोळंके यांचे अनेक मोठ्या भाजपा नेत्या सोबत विवीध कामा बाबत चर्चा करतांना अनेक दिवसापासून फोटो वृत्तपञात झळकत असल्याने मतदार संघात अनेक तर्क वितर्क लावले जात असतांना सोमवारी राष्ट्रवादी पक्षाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सोळंके काँलेज येथे आयोजित पञकार परिषदेत पञकारांनी पक्षांतराबाबत त्यांना छेडले असता.त्यांनी मला मी भाजपात जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत असल्याबाबत मला माहीत नसल्याचे सांगत वेळ प्रसंगी मतदारांच्या इच्छेखात भाजपात जाण्याचा निर्णय घेवू शकतो असे म्हणुन हे वावड्या उठवणारे ही भाजपाचे आहेत. त्यांच्या मध्ये ही या चर्चेने घबराहट पसरली असून मला अनेक राजकीय पर्याय उपलब्ध आहेत.तर मुख्यमंञी एकनाथ शिंदे हे ही चांगले काम करत असून राञी दीड वाजेपर्यंत काम करुन ते जनतेच्या कामाचा निपटारा करत आहेत.तो ही पर्याय खुला अल्याचे म्हणत बाळासाहेबाची सेनेचे तालुका अध्यक्ष पञकार तुकाराम येवले यांच्याकडे पाहत आम्हाला घेता असा प्रश्न सोळंकेंनी केला. सत्ता बदल झाल्यानंतर आ. सोळंके हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार होत होती. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचे व त्यांचे फोटो प्रकाशित झाल्याने चर्चा रंगू लागली होती. येथील सुंदरराव सोळुंके महाविद्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीकडून 17 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सोळंके यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेबांच्या सेनेत बीड जिल्ह्यात मजबूत नेता नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या चांगले काम सुरु असुन त्यांना बीड जिल्ह्यात मजबूत नेत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्या पक्षात देखील प्रवेश शक्य असुन सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय खुल्ले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी तेलंगणा मधील केसीआर सरकारच्या चांगल्या कामाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!