बीड क्राईम माजलगाव

माजलागवातील दोन लाचखोर महावितरणच्या कर्मचार्‍यांना एसीबीचा ‘झटका’

माजलगाव – माजलगाव येथील महावितरण कंपनीतील एका ग्राहकाकडून 13 हजार रूपयांची लाच स्वीकारताना दोन कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडून कारवाईचा झटका’ दिला आहे. लाचलूचपत प्रतिबंधे विभागाच्या बीड शाखेने बुधवारी ही कारवाई केली आहे.
रामा बन्सीधर लोखंडे (वय 38, नोकरी, कनिष्ठ लिपिक, म.रा.वि.वि. कंपनी. उपविभाग माजलगाव), ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ (वय 30, कनिष्ठ सहाय्यक, म. रा. वि. वि. कंपनी, उपविभाग, माजलगाव) असे लाचखोर कर्मचार्‍यांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदाराने विकत घेतलेल्या जागेवर जुने मीटर बदलून नवीन मिटर बसवले असे सांगून जास्त बिल न देण्यासाठी पंचासमक्ष 40 हजार रुपये लाच मागणी केली. तडजोडीअंती 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून रामा लोखंडे यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारली. लाच रकमेसह त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर पांचाळ यांना रंगेहाथ पकडले. हा सापळा पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी लावला होता. त्यांना पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक- गणेश म्हेत्रे आदींनी सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!