महाराष्ट्र राजकारण

अजितदादांच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि दालनांचं वाटप; कुणाला काय मिळालं, वाचा संपूर्ण लिस्ट

अजित पवार यांच्या गटाने पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजितदादांसह ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस उलटून गेलेले असले तरी अनेकांच्या नाराजी नाट्यामुळे आणखी खातेवाटप झालेलं नाहीये. अशा मानापमानाच्या परिस्थितीत नव्या मंत्र्यांच्या बंगल्यांचं आणि दालनांचं वाटप झालेलं आहे. खात्याप्रमाणे हे मंत्री मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान मिळण्याची वाट पाहत होते. अखेर नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि दालनांचं वाटप झालेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात मुख्य इमारतीत सहाव्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. या दालनाचे नूतनीकरण होईपर्यंत अजित पवार यांना विस्तारित इमारतीत पाचव्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. तर छगन भुजबळ यांना दुसऱ्या मजल्यावर, मुश्रीफांना चौथ्या मजल्यावर, वळसे पाटील तिसऱ्या मजल्यावर, धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावर, आदिती तटकरेंना पहिल्या मजल्यावर, अनिल पाटील यांना चौथ्या मजल्यावर तर संजय बनसोडे यांना तिसऱ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले?
१ छगन चंद्रकांत भुजबळ, मा. मंत्री ब-६ (सिध्दगड)
२ हसन मियालाल मुश्रीफ, मा.मंत्री क-८ (विशालगड)
३ दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, मा.मंत्री क-१ (सुवर्णगड)
४ धनंजय पंडितराव मुंडे, मा. मंत्री क-६ (प्रचितगड)
५ धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, मा.मंत्री सुरुची-३
६ अनिल भाईदास पाटील, मा.मंत्री सुरुची-८
७ संजय बाबराव बनसोडे, मा.मंत्री सुरुची-१८

कोणत्या मंत्र्यांना, कोणतं दालन मिळालं?
१ छगन भुजबळ, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, २ रा मजला, दालन क्र. २०१ दक्षिण बाजू
२ हसन मुश्रीफ, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०७
३ दिलीप वळसे–पाटील, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र. ३०३, उत्तर बाजू
४ धनजंय मुंडे, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत २ रा मजला, दालन क्र. २०१ ते २०४, २१२
५ धर्मराव बाबा आत्राम, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, ६ वा मजला, दालन क्र. ६०१, ६०२, ६०४
६ आदिती तटकरे, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, १ ला मजला, दालन क्र. १०३, उत्तर बाजू
७ अनिल पाटील, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०१, दक्षिण बाजू
8 संजय बनसोडे, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र. ३०१, दक्षिण बाजू

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!