माजलगाव

निवडणुकीसह दुष्काळ निवारणाची कामेही गतीने करावीत, जिल्हाधिकार्‍यांच्या कडक सुचना, माजलगावच्या धरणालाही दिली भेट


बीड,  दि. 5 (लोकाशा न्यूज) : निवडणुकीसह दुष्काळ निवारणाचे कामे ही करावी असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे  यांनी माजलगाव येथील आढावा बैठकीत अधिकार्‍यांना तसेच कर्मचार्‍यांना दिले.
39 बीड मतदार संघातील 229माजलगाव विधानसभा मतदार संघा ची पाहणी काल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.  यावेळी त्यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकार्‍यांना सूचना केल्या. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार वर्षा मनाळे तसेच सर्वच विभागातील कार्यालयीन प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाणीटंचाईची असून नीट व्यवस्थापन करून पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना कमी पोहोचतील अशी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. माजलगाव धरणाला भेट देऊन इथली प्रत्यक्ष परिस्थिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाणून घेतली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे नीट नियोजन करावे आणि मागील त्याला काम मिळेल असे व्यवस्थापन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूम ही मुलींची शासकीय वस्तीगृह येथे तयार करण्यात आले असून या ठिकाणची ची पाहणी करून सुरक्षात्मक उपायांची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. माजलगाव तहसील कार्यालयात निवडणुकी संदर्भात वेगवेगळे कक्ष स्थापन झाले असून या कक्षांना यावेळी त्यांनी भेटी दिल्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक साहित्याची तपासणीही केली. 39 – बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथील सादोळा रोड केसापुरी कॅम्प येथील निगराणी पथकाची  पाहणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!