माजलगाव

चिडवण्याच्या कारणावरून दोन मित्रात वाद.शेततळ्यात बुडवून मित्रानेच केला मित्राचा खून, माजलगावच्या पवारवाडी येथील घटना

माजलगाव : लोकाशा न्युज

तोतरे बोलण्याच्या चिडवण्यावरून दोन मित्रात वाद झाला.दरम्यान या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.यावेळी चिडलेल्या मित्राने चिडवणाऱ्या मित्राला शेततळ्यात ढकलून त्याच्या छातीवर बसून त्याचा बुडवून खून केला.ही घटना मंगळवार दि.26 रोजी दुपारी माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात घडली.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,कुंडलिक श्रीपाद धुमाळ (वय 24) रा.पवारवाडी हा आपल्या दोन मित्रासोबत अशोक खामकर यांच्या शेतात असणाऱ्या शेततळ्याजवळ बसला होता. यावेळी याच गावातील त्याचा मित्र संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे तेथे आला.यावेळी कुंडलिक धुमाळ याने संभा मोरे याला त्याच्यात असणाऱ्या तोतरे बोलण्याच्या व्यंगावरून चिडवण्यास सुरुवात केली.यावरून दोघात मोठा वाद झाला.या वादाचे पर्यवसान हाणामारी झाले.दरम्यान चिडलेल्या संभा मोरे याने श्रीपाद धुमाळला जवळच असलेल्या शेततळ्यात ढकलून दिले.स्वतःही त्याच्या छातीवर उडी मारली.व श्वास कोंडेपर्यंत त्याला बुडवून ठेवले.या घटनेत कुंडलिक धुमाळचा जीव निघून गेला.दरम्यान मयताचे वडील भीमराव साधू धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302 भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी 

सपोनि विजय जॉनवल हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!