बीड

जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचार भोवला, रमेश भताने यांच्यासह सहा जणांविरुद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल‌


परळी वैजनाथ दि १९ :- बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून २० लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्या प्रकरणात दोषी पावलेल्या सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भतानेसह सहा अधिकाऱ्यांवर परळीचे तालुका कृषी अधिकारी अशोक अंबादासराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर आरोपींनी केलेला भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करा असा आदेश एस एस धपाटे उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये १३८ मजूर संस्था तसेच २९ गुत्तेदार व सुशिक्षित बेकार अभियंता २८ अधिकारी यांच्यावर एफ आय आर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र मुख्य आरोपी रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त यांच्यासह इतर ५ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक यांनी लक्ष वेधले होते.
सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हे दाखल करण्यास कृषी खात्यामार्फत विलंब करण्यात आला होता. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये बोगस कामाचा फार मोठा घोटाळा असून गुत्तेदार व अधिकारी यांना राजकीय नेते सर्व स्तरातून वाचविण्यासाठी हस्तक्षेप होत असल्यामुळे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी उप लोक आयुक्त कार्यालयात दि.१४/१०/२०२० ला ऑनलाईन सुनावणी द्वारे त्यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक व पूर्वीचे जिल्हा कृषी अधीक्षक सेवानिवृत्त रमेश भताने सह उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक पदभार त्यांनी अनेक वेळा घेतलेला आहे. त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची नियमबाह्य बोगस कामे दाखवून बिले उचलल्या बाबत शासनाच्या कोणतेच निकषांचे पालन केले नाही. परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत योजनेमधील दोन्ही टप्प्यामध्ये चौकशी अंतर्गत ८ कोटी ३६ लाख भ्रष्टाचार झाला हे कृषी खात्याच्या दक्षता पथकामार्फत सिद्ध झालेले आहे. त्यामध्ये ५० टक्के गुत्तेदार व ५० टक्के अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परळी विधानसभा मतदार संघा अंतर्गत जलयुक्त शिवार योजने मध्ये ७५ टक्के भ्रष्टाचार झाल्याचे आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे चौकशी साठी अर्ज केला होता.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामांची आणि भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी होऊन भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने परळीचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह भीमराव बांगर, शंकर गव्हाणे, दीपक पवार, सुनील रामराव जायभाय व सौ कमल लिंबकर ह्या सहा आरोपी विरुद्ध जलयुक्त शिवार योजनेत इ स २०१५ ते २०१७ दरम्यान १८ लाख ३२ हजार ३६६ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गु र नंबर ‌७७/२०२१ कलम ४२०, ४०८, ४६८, ४७१, ३४ भा द वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!