गेवराई

अमरसिंह पंडित यांच्या हस्ते ऑक्सिजन बेडचे लोकार्पण,स्वखर्चातून १८ ऑक्सिजन बेड कार्यान्वित, रुग्णांना दिलासा

गेवराई दि.१८ ( प्रतिनिधी) शारदा कोविड केअर सेंटर येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शासनाच्या आर्थिक मदतीविना १८ ऑक्सिजन बेड कार्यान्वित केले असून त्याचा शुभारंभ मंगळवार दि. १८ मे रोजी करण्यात आला. स्वखर्चाने उभारलेले बीड जिल्ह्यातील पहिले ऑक्सिजन बेड कार्यान्वित असलेले शारदा कोविड केअर सेंटर ठरले आहे. यामुळे कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्याचे लोकार्पण केले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेंगुलवार, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

गेवराई तालुक्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून शारदा हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, शिवाजीनगर, गढी येथील शारदा कोविड केअर सेंटरमध्ये १८ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले. त्याचे लोकार्पण माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय स्वखर्चाने १८ ऑक्सिजन बेडचा सुसज्ज विभाग कार्यान्वित करणारे शारदा कोविड केअर सेंटर हे बीड जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटर ठरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर, अंतर्गत लाईन व इतर सर्व आवश्यक उभारणी करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत शासनाकडून करण्यात आली नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कोविड रुग्णांशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

यावेळी तळेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुदाम पवार यांनी ३०० मास्क, २५ लि. सॅनिटायझर सह आदी साहित्य अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सुदाम पवार, डॉ. शिंदे मॅडम, डॉ. राठोड, अक्षय पवार, संदिप मडके, मंगेश खरात, रविंद्र चोरमले, बाळासाहेब चौधरी, सुरेश पवार, ज्ञानेश्वर चौधरी, रामेश्वर गरड आदी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!