बीड

रेमडिसीवीर इंजेक्शनवर नियंत्रणासाठी जिल्ह्यात समिती गठीत

बीड, दि.15 (लोकाशा न्यूज) :– जिल्ह्यात कोव्हीड – 19 कोरोना विषाणु संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे . रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी व होणारा पुरवठा यामध्ये तफावत येत असल्याने या वाढत्या रुग्णसंख्येस गरजेप्रमाणे रेमडिसीवीर इंजेक्शनची पुरवठा उपलब्ध करण्यासाठी तसेच रेमडिसीवीर इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेऊन राज्यस्तरीय टास्कफोर्सच्या निर्देशानुसार ज्यांना खरोखर रेमडिसीवीर इंजेक्शनची गरज आहे त्यांनाच ते उपलब्ध करुन देणे ही आजरोजीची महत्वपूर्ण गरज आहे . त्यामुळे खालील अधिकारी यांची रेमडिसीवीर इंजेक्शनच नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. श्री.प्रविण धरमकर , उपजिल्हा निवडणूक अधिकारी बीड, श्री.सुर्यकांत गित्ते , जिल्हा शल्य चिकीत्सक बीड, श्री.रामेश्वर डोईफोडे , औषध निरीक्षक बीड, श्री.अर्जुन चाटे , स्वीय सहाय्यक अपर जिल्हाधिकारी बीड यांचा समितीमध्ये समावेश आहे. रेमडिसीवीर इंजेक्शनची गरज आहे त्यांनाच ते उपलब्ध करून देणे यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणे व त्याबाबतचा नोंदी ठेवून जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी अवगत करणे तसेच तक्रारीची नोंद घेऊन त्याचे निराकरण करणे आदी जवाबदऱ्या या समितीवर देण्यात आल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!