परळी

पंकजाताईंच्या बहिष्काराच्या आवाहनाला मिळाला प्रतिसाद,डीसीसी निवडणूकीत जिल्ह्यात मतदान 57 तर परळीत 47 टक्के अत्यल्प मतदानामुळे पालकमंत्र्यांना दणका, स्वत:च्या मतदार संघात टक्का वाढविता आली नाही, पालकमंत्र्यांनी चिंतन करावे


परळी दि. 20 (लोकाशा न्यूज): बीड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालण्याच्या पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. केज, आष्टी, पाटोदा, वडवणी येथे कमी मतदान झाले. जिल्हयात 57 टक्के तर परळीत केवळ 47 टक्के अत्यल्प मतदान झाल्याने पालकमंत्र्यांना दणका बसल्याचे बोलले जात आहे. वास्तविकत: डीसीसीच्या मतदानामध्ये सत्ताधार्‍यांच्या पॅनलाला गेवराई आणि माजलगावने तारले आहे, स्वत:च्या मतदार संघात पालकमंत्र्यांना मताची टक्केवारी वाढवीता आली नाही, त्यामुळे ही बाब पालकमंत्र्यांना चिंतन करायला लावणारी आहे.
जिल्हा बॅक निवडणूकीच्या आठ जागांसाठी आज मतदान झाले. ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी आणि लोकशाहीचा अवमान करणारी असल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आजच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन काल केले होते, त्यांनी केलेल्या आवाहनाचा परिणाम आजच्या मतदानावर ठिक ठिकाणी दिसून आला. केज, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी येथे अतिशय कमी मतदान झाले तर अन्य ठिकाणीही मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हयात 57 टक्के मतदान झाले, तथापि बोगस प्रकार होऊ नयेत यासाठी भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन होते. परळीत चांगले मतदान होईल अशी राष्ट्रवादीची आशा पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनामुळे फोल ठरली. इथले मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत. याठिकाणी फक्त 47 टक्के मतदान झाले. अत्यल्प मतदानामुळे राष्ट्रवादीने नैराश्यातून बोगस मतदान तसेच मारामारी, गोंधळ करण्याचा प्रयत्न केला पण तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!