परळी

डीसीसीच्या निवडणूकीत परळीतील केंद्रावर बोगस मतदान, निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल


बीड, 20 मार्च : बीड जिल्हा बँकेच्या आज आठ जागांसाठी मतदान झाले. यादरम्यान परळीमध्ये मात्र बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदाराचे आधीच मतदान झाले असल्याची नोंद झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. यादरम्यान परळीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वैद्यनाथ सहकारी औद्योगिक संस्था येथील केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुधाकर प्रभाकर फड यांनी मतदान न करता मतदान झाले कसे असा सवाल उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे. बोगस मतदान करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परळी हा राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!