बीड परळी

पंकज कुमावतांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड ;
रोख रकमेसह साठ लाखांचा मुद्देमाल जप्त

परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

परळी, दि.३० (लोकाशा न्युज):- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी – अंबाजोगाई रोडवरील परळी तालुक्यातील भोपळा शिवारात एका हॉटेलच्या मागील बाजूस शेतात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करीत रोख रकमेसह जवळपास ६० लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ३० जुगार्यांना गजाआड केले आहे. दरम्यान या कारवाईने परळी तालुक्यात खळबळ माजली असून सपोअ पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन होत आहे. ही कारवाई काल दिनांक २९ जुलै २०२२ रोजी रात्री १२ वादनाच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की अंबाजोगाई ते परळी जाणारे रोडचे उत्तर बाजूस भोपला शिवारात हॉटेल सातबाराचे पाठीमागे विठ्ठल मुंडे यांचे शेतात पत्र्याचे बंद शेडमध्ये इसम नामे रविशंकर व्यंकटराव मुंडे रा, वरवटी ता अंबाजोगाई हा विनापरवाना बेकादेशीर ते आपले स्वतःचे फायदा करिता काही लोकांना एकत्र बसून त्यांच्याकडून पत्यावर पैसे लावून जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती मा पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः व त्यांच्या पथकातील पोलीसअधिकारी व आमलदार यांना सोबत घेऊन जाऊन रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी जन्ना मन्ना , अंदर बाहेर नावाचा जुगार खेळणारे व खेळविणारे २८ लोक जागीच मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी ३,८६, ६८० रुपये व २६ मोबाईल किमती ३,८१००० रुपये व ४ चार चाकी वाहने किमती ५१,५८,६७,६८० रुपयाचा माल पंचा समक्ष जप्त करून २८ आरोपींना ताब्यात घेऊन एकूण २९ आरोपी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांचे फिर्याद वरून पोस्टे परळी ग्रामीण येथे कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर ,बालाजी दराडे ,दिलीप गीते, रामहरी भनडणे, अनील मंधे ,संजय टूले ,महादेव बहीरवाल ,यांनी केली आहे.
दरम्यान धाडसी कारवाई बद्दल परळी तालुक्यात खळबळ माजली असून जे परळी ग्रामीण पोलिसांना आजतागायत जमले नाही ते सपोअ पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाने करून दाखवले याबाबत चर्चेस उधाण आले असून पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!