बीड राजकारण

अंथरवणपिंप्री तांड्याच्या ग्रामपंचायतीवर सुशिल पवारांचा झेंडा

मतदारांनी दाखविला एकहाती कौल; विजयी उमेदवारांसह नागरिकांचा जल्लोष

बीड, दि.5 (लोकाशा न्युज)ः- कायम विभासभिमुखनेतृत्व असेलेल्या सुशिल पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सुजान मतदारांकडून एकहाती सत्ता देण्याचे काम आहे. काल झालेल्या निवडणुकीमध्ये सुशिल पवार गटातील सातही उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहून सुलिश पवारांची ताकद दाखविण्याचे काम केले असून अंथरवणपिंप्री तांड्यांच्या ग्रामपंचायतीवर सुशिल दिनेश पवारांचा झेंडा फडकवित विजयी जल्लोष करण्यात आला.
बीड तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणार्‍या अंथरवणपिंप्री तांडा ग्रामपंचायतीचा निकाल येथील सुजान मतदारांनी संत सेवालाल महाराज ग्राम समद्धी उत्कृष्ट पॅनलच्या पाठीशी  खंबीरपणे राहू  दाखवून दिले आहे. यामध्ये दिनेश लाला पवार, अनिता दिनशे पवार, पांडूरंग रामभाऊ पवार, विमल रामभाऊ पवार, कमलबाई बाबु पवार, रमनाबाई मोहन राठोड, प्रेमदास मनोहर राठोड आदी उमेदवारांच्या पाठीवर मतदानरूपी आशिर्वाद देवून ग्रामपंचायत मध्ये पाठविण्याचे काम केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विकास हीच दिशा आणि विकास हेच ध्यास मनी बाळगुन अहोरात्र सर्वसामान्यांच्या कामासाठी झगडणार्‍या विकासभिमुख नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करत विरोधकांचा सुपटा साफ करण्याचे काम येथील सुजान मतदारांनी केले असून अंथरवणपिंप्री तांड्याच्याग्रामपंचायतीवर सुशिल दिनेश पवारा यांचा झेंडा फडकविण्या आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!