महाराष्ट्र राजकारण

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष:आशिष शेलारांना मुंबई अध्यक्षपद; मंत्रिपदी वर्णी न लागल्याने महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज दुपारी 4 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या या नियुक्त्यांमुळे राज्यात फडणवीसांच्या गटाला धक्का बसला असून, पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या समर्थकांना मोठ्या जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

कोण आहेत बावनकुळे?
चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. 26 डिसेंबर 2014 रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपकडून त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2004, 2009 आणि 2014 पासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारले होते. त्यांच्या पत्नी ज्योती यांनाही तिकीट देण्यात आले नाही. आणि त्यांच्या मतदारसंघ असलेल्या कामठीत त्यांच्याऐवजी भाजपचे जुने कार्यकर्ते टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली गेली. यानंतर बावनकुळे यांना पक्षाच्या कार्यापासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र विधान परिषदेवर संधी देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देत त्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. तर जातीय समीकरणच्या दृष्टीने मराठा मुख्यमंत्री, ब्राह्मण उपमुख्यमंत्री, आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष देत सामाजीक समतोल जपण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

आशिष शेलार कोण?
भाजपमध्ये अगदी तळागाळातून येऊन ज्यांनी आपली मुद्रा उमटविली, अशांमध्ये शेलार एक आहेत. मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतले. नंतर वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले-रुजलेले शेलार हे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर अभाविप, त्यानंतर भाजयुमो आणि मग भाजप असा रीतसर प्रवास आशिष शेलार यांनी केला आहे. त्यानंतर काही काळ ते मंत्रिमंडळातही पोहचले होते, शिवसेनेशी उघड संघर्षाची भूमिका घेणारे जे मोजके भाजपनेते झाले, त्यात शेलार अग्रभागी राहिले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्याने विजयी तर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांंदा 26,550 मताधिक्य राखून विजयी झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!