महाराष्ट्र

अखेर अशोक चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश


राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल(सोमवारी) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील  भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!