महाराष्ट्र बीड

डॅशिंग अधिकारी आता गाजवणार गडचिरोली; आदित्य जीवनेंची सहायक जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

बीड, दि.1 (मुकेश झनझने) ः- बीड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून डाशिंगबाज कार्य केलेल्या आयएएस आदित्य जीवने यांची शासनाने नुकतीच सहायक जिल्हाधिकारी एटापल्ली उपविभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. बीड, पाटोद्यात वाळुमाफिया, माजलगावात आतिक्रमणधारकांवर कारवाया करत जीवनेंनी डॅशिंग अधिकार्‍याची छाप सोडलेली आहे. हे डॅशिंग अधिकारी आता गडचिरोली गाजवणार आहेत.

लाल बहादूर शास्त्री अकादमी, मसूरी येथील फेज-2 चे प्रशिक्षण संपवून राज्य शासनाकडे रुजू झालेल्या आयएएस अधिकार्‍यांची शासनाने विविध पदावर नियुक्ती केली आहे. यात आयएएस आदित्य जीवने व आयएएस करिष्मा नायर यांचाही समावेश आहे. आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी प्रशिक्षण कालावधीत बीड जिल्ह्यात पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी, बीड तहसीलदार, बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, माजलगांव नगर पालिकेचे सीओ पदाची सुत्रे संभाळली आहेत. माजलगांवमध्ये आतिक्रमण हटाव मोहिम राबवून आतिक्रमण धारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तर बीड तहसीलदार व पाटोदा उपविभागीय अधिकारी असतांना वाळुमाफियांवर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडलेले आहे. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असतांना जलपुणर्भरण, शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ झटपट मिळवून दिलेला आहे. बीडमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आययएस आदित्य जीवनेंचे शासनाने आता गडचिरोलीच्या सहायक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!