बीड

पुन्हा जिल्ह्यात बजरंग बप्पांनीच मारला पहिला नंबर, येडेश्‍वरी कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता 2750 रूपयांनी काढला  


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे माजी सभापती बजरंग बप्पा सोनवणे हे खरोखरच शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत. जिल्ह्यात ऊसाला सर्वात जास्त भाव देण्याचे काम ते दरवर्षी करत आहेत. यावर्षीच्या हंगामातही त्यांनी पहिला नंबर मारला आहे. त्यांच्या नेतृत्वात येडेश्‍वरी साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या खात्यात ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन 2750 रूपयांनी जमा केला आहे.  
केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्‍वरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दि. 1 नोव्हेंबर 2023 ते 15 नोव्हेंबर 2023 कालावधीचा पहिला हप्ता 2750 प्रमाणे देवून बीड जिल्ह्यात सर्वाधीक भाव देणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याचा दहावा गळीत हंगाम दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी असून दि. चार डिसेंबरपर्यंत 33 दिवसात 1,77,713 मे.टन उसाचे गाळप केले आहे. व डिस्टीलरी विभागातून इथेनॉल 3076813 लि.आर.एस. 4824892 लि. उत्पादीत झाले आहे. व को-जन विभागातून एकूण विज निर्मिती युनिट 6338300, एक्सपोर्ट 2484000 युनिट कारखाना वापर झालेले आहे. तरी सर्व शेतकरी सभासदांनी चालू गळीत हंगामात कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे. येडेश्‍वरी साखर कारखाना नेहमीच शेतकर्‍यांचे हित जोपासणारा व मराठवाड्यात ऊसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मी कधीच शेतकर्‍यांवर अन्याय
होवू देणार नाही : सोनवणे
येडेश्‍वरी साखर कारखाना नेहमीच शेतकर्‍यांचे हित जोपासणारा व मराठवाड्यात ऊसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना ठरला आहे. मी कधीच शेतकर्‍यांवर अन्याय होवू देणार नाही, यावर्षी पहिला हप्ता 2750 रूपयांनी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तरी सर्व शेतकरी सभासदांनी चालू गळीत हंगामात कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!