बीड परळी

परळीत तरूणाचा धारधार शस्त्राने खून

वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानातील झाडीत आढळला मृतदेह

परळी वैजनाथ दि २२ (लोकाशा न्युज) :- परळीत महादेव दत्तात्रय मुंडे राहणार भोपळा ता परळी ह मु परळी ह्या तरूणाची धारधार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली असून त्या तरुणाचा मृतदेह वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदानातील झाडीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असुन मयत तरूणाचा म्रतदेह परळीच्या उप जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला आहे. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!