परळी

फेसबुकवरील मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेवर बलात्कार अन् अमानुष मारहाण; बीडच्या अकबर बबन शेख नराधमाच्या पोलीसांनी गुन्हा दाखल करून मुसक्या आवळल्या


परळी वैजनाथ, दि. 3 (लोकाशा न्यूज) :- फेसबुक वर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत बीडच्या अकबर बबन शेख या नराधमाने परळीच्या एका महिलेवर सतत सहा महिने अत्याचार करून अमानुष मारहाण करीत अतोनात त्रास दिल्याची खळबळजळ घटना घडली. याप्रकरणी त्रस्त महिलेने तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वै येथील शारदानगर भागातील 32 वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माहिती देवाणघेवाण झाली. त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात करुन फिर्यादिस ब्लॅकमेल करणे सुरु झाले. आरोपीने फिर्यादिचे राहते घरी शारदानगर परळी वै येथे जावुन फिर्यादिचे ईच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच दि. 13 मार्च 2024 रोजी फिर्यादिचे पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादि महिलेला चापटा बुक्याने मारहाण केली. दि. 2 एप्रिल 2024 रोजी फिर्यादिचे घरी कोणी नसताना सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास आरोपी अकबर बबन शेख याने घरी जावुन तु मला कॉल करून का बोलत नाहीस असे म्हणुन फिर्यादिचे अंगावर जावुन वाईट हेतुने हात पकडुन छातीला हात लावुन फिर्यादिचा विनयभंग केला. त्यास प्रतीकार करत असताना त्याने फिर्यादिस उचलुन जमीनीवर आपटले. त्यावेळी आरोपीने हातातील काहीतरी डोक्यात मारुन फिर्यादी महिलेस जखमी केले. त्याने उजवा हात दाबुन धरल्याने हातातील बांगड्या फुटुन हातालाही जखम झाली आहे. अशा आशयाची फिर्याद दिल्यानंतर आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र नंबर 46/2024 कलम 376,354, 354 (डी), 452,323,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या गंभीर प्रकरणी पिंक पथक अंबाजोगाई च्या पोउपनि प्रतिभा एम. शेटे, संभाजीनगर पोनि उस्मान शेख, सपोनि प्रविण जाधव, पो अं. भगवान गुट्टे, खरटमोल, अंबाड, महिला पोलीस कर्मचारी पुनम राठोड आदींनी पुढील तपास करीत आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड यास मुस्क्या आवळीत जेरबंद केले असता न्यायालयाने आरोपी अकबर बबन शेख याची पाच दिवस पोलीस कस्टडीत रवानगी केली आहे. फेसबुक वरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते विशेषतः फेसबुक वापरणार्‍या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून फेसबुक वरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते असाच कांहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणी सोबत घडला घडला असून तमाम महिला आणि मुलींनी याची दखल गांभीर्याने घेऊन सावधानता बाळगावी असे मत अनेक सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!