बीड

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या प्रयत्नाने वाणी समाजाच्या स्मशानभूमी संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लागणार, वीरशैव लिंगायत वाणी समाज बांधवांनी मानले आभार


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वीरशैव लिंगायत वाणी समाजाच्या स्माशनभुमीला संरक्षण भिंत व इतर सुविधेचे प्रश्न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागणार आहेत. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या संरक्षण भिंत व इतर विकासासाठी ऑन द स्पॉट जावून निधी दिला आहे. या कामाची आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे व समाज बांधवांसोबत पाहणी केली. सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल वीरशैव लिंगायत वाणी समाज ट्रस्टच्या वतीने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानण्यात आले आहे.
बीड शहरातील वीरशैव लिंगायत वाणी समाजाची कंकालेश्वर मंदिराच्या पाठीमागे स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून ती दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या ठिकाणी संरक्षण भिंत, टोल गेट, पाण्याची टाकी, निवारा, बैठक व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने आ.संदिप भैय्यांना करताच आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सदर स्मशानभूमीची पाहणी स्थानिक विकास योजनेतून तात्काळ निधी देत असल्याचे सांगितले. आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने सदर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागल्याने समाज बांधवांनी आ.संदिप भैय्यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष कुंभेश्वर विभुते, परमेश्वर नगरे, मनोज ढेपे, बाळु मिटकरी, उत्तरेश्वर कानडे, किशोर जवळकर, विलास बेदरकर, दिनेश राजमाने, सचिन रेगुडे, सचिन शहागडकर, विश्वन होनमाने, चंद्रकांत स्वामी यांच्यासह आदी उपस्थित होते.

आ.संदिप भैय्यांनी दिली आंदोलनस्थळी भेट
प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे बैठक

बीड शहरातील बार्शी नाका ते इमामपूर रोडचे काम तात्काळ करण्यात यावे व इतर सुविधा पुरवण्यात याव्यात या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने बार्शी नाका परिसरात आंदोलन सुरू आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या आंदोलनस्थळी भेट देवून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे उद्या बैठक बोलावली आहे. इमामपूर रोडचा तात्काळ मार्गी लागावा या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल राहू, प्रशासनाकडून चांगली कामे करून घेवून या भागाच्या विकास कामासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. यावेळी शेषेराव घोडके, ज्ञानेश्वर राऊत, सय्यद सादेक, कल्याण जाधव, गणेश पवार, योगेश जगदाळे, भाऊसाहेब गलधर, दत्ता पवार, सुभाष डोके, गलधर भाऊसाहेब, कांबळे सुशिल, आबा ढगे, अशोक गायकवाड, मोमीन बसीयोद्दीन व आम आदमी पार्टीचे येडे उपस्थित होते. आंदोलनस्थळी भेट देते वेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे या भागातील नगरसेवक लक्ष्मण वीटकर, सुनिल महाकुंडे आदी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!