बीड

पदभार स्विकारताच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप कामाला लागले, रेखावार यांनी सुरू केलेली ई-टपालची सेवा नवे कलेक्टरही पुढे सुरूच ठेवणार



बीड,  दि. 19 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या काळात चांगल्या पध्दतीने काम करणारे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएएस रविंद्र जगताप यांना नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्ती होताच बुधवारी सायंकाळी रविंद्र जगताप यांनी बीडमध्ये येवून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे. कार्यालयीन कामकाजासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सुरू केलेली ई टपालची सेवा याही पुढे सुरू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून तुम्ही फक्त सर्व सामान्यांची कामे गतीने पुर्ण करा, असे आवाहन यावेळी जगताप यांनी महसूलच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनीही मार्गदर्शन केले,  त्यांनी मागील 11 महिण्यात आलेले अनेक अनुभव यावेळी सर्वांसमोर सांगितले, तर आपल्या जिल्ह्याचे नाव होईल असे काम करा, त्यातून तुमचे आयुष्यही समृद्ध होईल, असे आवाहन यावेळी रेखावार यांनी उपस्थित कर्मचारी आणि अधिकार्‍यांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना बुधवारी सायंकाळी निरोप देण्यात आला तर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना रेखावार म्हणाले, की अकरा महिन्यात आपण सर्वांनी आपलं कौशल्य पणाला लावून काम केले. बीड जिल्ह्याची टीम चांगली आहे. बीड जिल्ह्याची इमेज अतिशय चांगली आहे. प्रेरणा देणारी आहे, शिपाई, अव्वल कारकून, कर्मचारी- अधिकार्‍यांनी चांगले काम केले. आपण अनेक गोष्टी केल्या. सगळ्यात अवघड काम केलेले आहे. खात्रीने मराठवाड्यात उद्दिष्टे पूर्ण केले. आपण कधीही काम करताना कार्यालय बदलत जातात. आपण कोणासाठी काम करतो, हे आपल्याला माहीत आहे, ही सेवा तेवढ्यापुर्तीच  नाही. प्रत्येक फाईलमध्ये त्यात्या व्यक्तीचा चेहरा पाहता आला पाहिजे. बीड जिल्हा जसा आहे ती र्वीीीींहळ बदलण्याची जबाबदारी आपली आहे. मानसिकता बदलणे आपल्या हातात आहे. बीड जिल्ह्याचे स्वरूप, मानसिकता बदलत आहे, याबद्दल शंका नाही. काही गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत. आपण ज्या पद्धतीचे काम करतो. तो महसूल हा महत्वाचा आहे. समाजात याला वरचे स्थान आहे. एखादी बाब वेगळी आहे ती राबवायची आहे, त्यासाठी आधी महसूलची निवड केली जाते. आपल्या कामातून कधीही कोणाचे नुकसान होणार नाही, ही बाब महत्त्वाचे आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रशाशकीय कामाची पद्धत बदलत आहे. नवीन गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याच्यात समाधान न मानता वेगळे काही कारणे महत्त्वाचे आहे. बीड जिल्ह्यात जेवढे बदल केले ते इतर होणार नाहीत, मी गेल्यावर सुद्धा बदल कायम राहिला पाहिजे हा विचार आवश्यक आहे, कामातून रेकॉर्ड चांगले ठेवले तर कारवाई होणार नाही. वरिष्ठांना चांगले वाटेल असे बदल आपल्या कामातून घडवा, आनंददायी पद्धतीने काम करा, आपल्या जिल्ह्याचे नाव होईल असे काम करा, आपले आयुष्य देखील समृद्ध होईल, एक महत्त्वाचे गोष्ट सुरू करायची होती तो एक जॉगिंग ग्रुप सुरू करायचा होता. ते करता आलं नाही, मात्र यापुढे आपण करू शकता. किमान एक तास जॉगिंग करा, पुस्तके वाचा या दोन गोष्टी करा,  आभार व्यक्त करतो, मनापासून 11 महिने साथ दिली, कधी कधी नाराज व्हावे लागते हा कामाचा भाग आहे. अधिकार्‍यावर, ना. तहसीलदारांवर रागावलो, पण तो कर्तव्याचा भाग आहे. आपण सर्व जण गुणी अधिकारी आहात, जगताप यांनी आपला अनुभव वापरून चांगले काम करावे, असे सांगत रेखावार यांनी नव्या जिल्हाधिकार्‍यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.   तर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यावेळी म्हणाले, की आज पहिल्या दिवशी काय बोलावे असा प्रश्न मला पडला आहे. 93 पासून या खात्यात आहे. वेगवेगळ्या ऑफिसरसोबत काम करण्याची संधी मिळाली. अथक प्रयत्न केले, बीडमध्ये सर्व अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांनी चांगले काम केले,  ई ऑफिसचे काम मोठ्ठे आहे. चांगलं वाटलं हे ऐकून, त्यावेळी बीड जिल्ह्यात जायचं का? असा प्रश्‍न मला पडला होता,  मात्र या जिल्ह्यात चांगले लोक आहेत तिकडे जा असे एका माजी आमदाराने सांगितले. त्यानंतर बीडमध्ये आलो, त्यावेळी फार चांगल्या रितीने काम करता आलं. घाबरलो नाही जे व्हायचे ते होईल असे ठरवून काम केले. येथे किती काम करावे लागेल हे तुमच्या चेहर्‍यावर दिसतय. काही तरी प्रचंड डोक्यावर ओझे आहे असं वाटतंय. तुमचं हे ओझं टाकून द्या, फाईलमध्ये व्यक्तीचा चेहरा, कुटुंब आहे, त्या पद्धतीने काम करता येईल, असे सांगत जगताप यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये उत्साह निर्माण केला, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश आघाव पाटील यांनी तर आभार नामदेव टिळेकर यांनी केले.

अन् पहिल्याच दिवशी जगताप यांनी सर्वांना
खळखळून हसवले
काल येथील नियोजन विभागाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आपल्या संपूर्ण सेवेत आलेले जुने अनुभव सांगितले. एक एक फाईल कशा पध्दतीने 14-14  वर्षे पडून कशी राहते यासह त्यांनी अनेक अनुभव सांगितले, त्यांच्या याच अनुभवातून/भाषणातून यावेळी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी खळखळून हसले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!