बीड

बीड जिल्ह्यात लसीकरणाला सुरूवात


बीड, दि. 16 : अखेर जी लस येण्याची प्रतिक्षा होती ती बुधवारी पुर्ण झाली आहे, पहिल्या टप्प्यात दिली जाणारी लस बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी कोविडशिल्ड लसीचे 17640 इतके डोस प्राप्त आहेत. एका व्यक्तीला दोन डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8820 अधिकारी-कर्मचार्‍यांना ही लस देण्यास येणार आहे. याचा प्रारंभ आज दि. 16 जानेवारीपासून करण्यात आला. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई आणि आष्टी या केंद्रावरून लसीकरणाला सुरूवात झाली आहे.
बीड जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यासाठी जवळपास साडे सतरा हजार कोव्हीड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे नोंदविली होती, त्यानुसार बीड जिल्ह्यासाठी कोव्हीड लसचे 17640 डोस उपलब्ध झाले आहेत. आज दि. 16 जानेवारीपासून बीड जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहमेला सुरूवात करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, जिल्हा रुग्णालय बीड, उप जिल्हा रुग्णालय परळी, उप जिल्हा रूग्णालय गेवराई आणि ग्रा.रु.आष्टी याठिकाणी प्रत्येकी शंभर शंभर आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर बीड जिल्ह्यातील त्या पाच केंद्रावरून लसीकराला सुरूवात झाली आहे. येथील शासकीय रुग्णालयात करोना लसीकरणाला सुरवात करण्यात आली, यावेळी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार,जिल्हा आरोग्य समिती सदस्य विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, भागिरथ बियाणी सुनील मिसाळ,डॉ लक्ष्मण जाधव,संग्राम बांगर, ड संगीता धसे ,संजीवनी राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान डॉ. प्रीतमताईंनी सांगितल्याप्रमाणे भाजपची आरोग्य समिती जिल्हा आरोग्य विभागाच्या मदतीला धावून आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!