केज

महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी आ. नमिताताईंची निवड

केज, दि. 6 ऑक्टोबर : केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिताताई मुंदडा यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
प्रश्न छोटा असो या मोठा तो सोडविण्यासाठी आ. नमिताताई ह्या नेहमीच पुढे असतात, आमदर झाल्यापासून अवघ्या एकच वर्षात त्यांनी मतदार संघात आपल्या कामातून लोकांच्या मनात मोठा विश्वास निर्माण केला आहे, विशेष म्हणजे जनतेच्या प्रश्नासाठी त्या नेहमीच सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला जाबही विचारतात, यामुळे ते प्रश्न तात्काळ सूटतात, आता महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बाल हक्क आणि कल्याण
समितीच्या सदस्यपदी झालेल्या त्यांच्या निवडीमुळे अनेकांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!