केज

अंगावर निर्दयीपणे ट्रक घालून खून, तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल, पत्नीसह नातेवाईकांचा संशय खरा ठरला, दत्तात्रय केदार मृत्यू प्रकरण, पोलिसांनी लावला खुनाचा छडा


(केज प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव ते विडा रस्त्यावर आढळलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून प्रेताची ओळख पटल्यानंतर हा अपघात नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पत्नीसह नातेवाईकांनी व्यक्त केला होता. आता तो संशय खरा ठरला असून त्याला तिघांनी जेवण करण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून त्याच्या अंगावर व डोक्यावर ट्रक घालून डोक्याचा चेंदामेंदा करून ठार केले आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार ( दि. २७ मार्च ) रोजी केज तालुक्यातील ( गप्पेवाडी ता. केज ) येथील दत्तात्रय केदार व त्यांची पत्नी सखुबाई दत्तात्रय केदार यांनी दुपारपर्यंत शेतातील कामे करून घरी आले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास मयत दत्तात्रय संदीपान केदार हे त्यांची बहीण असलेल्या उषाबाई चौरे( रा. नारेवाडी ता. केज) येथून माहेरी आणण्यासाठी मोटार सायकल वरून गेले होते. तेथून ते सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची बहीण उषाबाई यांना घेऊन घरी आले. त्या नंतर दत्तात्रय केदार हे पत्नी सखुबाई दत्तात्रय केदार हिला म्हणाले की, त्याचा मित्र मुख्य आरोपी असलेल्या विलास उत्तम केदार ( वय, ३८ रा. गप्पेवाडी ता. केज ) हा त्याची ट्रक घेऊन गावात आला आहे. तो त्यांना म्हणाला की, आपण जालना येथे जाऊन ट्रकमधील माल खाली करून परत येऊ , तू माझ्यासोबत चल, असे त्याने पत्नीला सांगितले . त्यावर मयत दत्तात्रय संदीपान केदार याची पत्नी त्यांना म्हणाली की, तुम्ही त्याचे सोबत जाऊ नका . कारण सासरे यांचे उद्या मासिक आहे. त्यावर तिला म्हणाले की, विलास उत्तम केदार , विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर धोंडीबा चौरे हे चौघे सोबत जालना येथे जाऊन वडलांच्या मासिकाला परत येऊ. नाही तर त्यांच्या सोबत जाऊन जेवण करून लागलीच परत घरी येतो. असे सांगून संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून एकटेच निघून गेले. त्यांनतर आठ वाजेच्या सुमारास त्यांची बहीण उषाबाई चौरे यांनी तिच्या मोबाईलवरून भाऊ दत्तात्रय यांच्या मोबाईलवर फोन करून जेवण करण्यासाठी घरी येण्यास सांगितले. तेंव्हा दत्तात्रय हे म्हणाले की, मी पाच ते दहा मिनिटात घरी येतो. तुम्ही जेवण करून घ्या. असे म्हटल्यावर सर्वजण जेवण करून झोपी गेले. त्यांनतर दुसरे दिवशी ( गुरुवार दि. २८ मार्च ) रोजी सकाळी पती दत्तात्रय यांच्या मोबाईलवर आई उर्मिला केदार हिने फोन केला असता त्याचा फोन बंद होता. म्हणून त्यांनतर त्यांनी गावातील विलास उत्तम केदार म्हणाला की, दत्तात्रय हा माझ्यासोबत आलेला नाही. तो कोठे आहे ? हे मला माहीत नाही. त्यावर पत्नी सखुबाई भाऊ धनराज व आई उर्मिला यांनी दत्तात्रय यांचा आजूबाजूला गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला . परंतु दत्तात्रय मिळून न आल्याने त्यांनतर ( शुक्रवार दि. २९ मार्च ) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दत्तात्रय यांची पत्नी भाऊ व भावजई हे केज पोलिस ठाण्यात दत्तात्रय केदार हे हरवले असले बाबतची तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळेस तेथील पोलिसांनी मला सांगितले की, ( दि. २८ मार्च ) रोजी सकाळी आठच्या सुमारास पिंपळगाव ते विडा जाणारा रस्त्याच्या लगत पिंपळगाव शिवारात एक बेवारस मृतदेह आढळला आहे. त्याचे प्रेत सरकारी दवाखान्यात केज येथे शवग्रहात ठेवण्यात आलेला आहे. त्यांनी मयताचा फोटो दाखवला तो फोटो पाहून सदरील मयत व्यक्ती हा दत्तात्रय संदीपान केदार ( वय, ३५ रा. गप्पेवाडी ता. केज ) असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दत्तात्रय केदार याला विलास केदार व त्याचे साथीदार विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर चौरे यांनी संगनमत करुन मयत दत्तात्रय केदार याला जेवण्याच्या बहाण्याने नेऊन पिंपळगाव ते विडा रस्त्यावर रात्री निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावरून व छातीवरून दोन – तीन वेळेस ट्रक घालून खून केला. यात दत्तात्रय केदार याच्या डोक्याची कवटी फुटून त्यातून मेंदू बाहेर आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मयत दत्तात्रय संदीपान केदार याची पत्नी सखुबाई दत्तात्रय केदार हिच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी विलास उत्तम केदार, विकास मधुकर केदार आणि परमेश्वर धोंडीबा चौरे या तिघांच्या विरूध्द केज पोलिस ठाण्यात गु.र.न. १६३/ २०२४ भा.दं.वी. ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!