बीड केज

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कार व रिक्षाचा अपघात; चालकाच्या संतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मस्साजोगपासून दोन किलो मीटर अंतरावरील घटना

मस्साजोग -केज ते माजरसुंबा राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या मस्साजोग पासून दोन किलो मीटर अंतरावर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या चार चाकी वाहनाचा व ॲपे पॅसेंजर रिक्षाचा अपघात झाल्याची घटना दिनांक १५ ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या चार चाकी वाहनाला समोरून येणाऱ्या ॲपे पॅसेंजर रिक्षा एम एच क्रमांक 23 एक्स ३३४५ या रिक्षाने धडक दिली.सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड येथील कार्यक्रम आटोपून भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि राम कुलकर्णी हे त्यांच्या चार चाकी वाहनाने अंबाजोगाईकडे जात असताना . मस्साजोग गावापासून दोन किलो मीटर अंतरावर त्यांच्या समोरून येणारा ॲपे पॅसेंजर रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या चार चाकी वाहनाला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान चार चाकी वाहन बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. तर, रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले असून ते तिथे अंबाजोगाई येथील कार्यक्रमासाठी मुक्कामी असणार आहेत. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी पोहोचले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!