बीड

लागा कामाला; जिह्यातील 704 ग्रा.पं. निवडणूक कार्यक्रम जाहीर


बीड, दि.9 (मुकेश झनझने) ः माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणार्‍या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला आहे. यात बीड जिल्ह्यातील 704 ग्राम पंचायतचा समावेश आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.18 डिसेंम्बर 2022 रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.
माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणार्‍या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यात सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायती असून यात बीड जिल्ह्यातील सुमारे सातशे चार ग्रामपंचायतचा समावेश आहे. या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. अखेर आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे कार्यक्रम

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!