क्राईम केज बीड

नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी महिलेचा खून

पंकज कुमावत सह केज पोलीस स्टेशनचे पीआय घटनास्थळी दाखल

नांदुरघाट :- नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयच्या पाठीमागे पारधी वस्ती असून हंगेवाडी गायरान म्हणतात त्याठिकाणी पंधरा ते वीस पारधी कुटुंबे राहतात दिनांक 21 च्या मध्यरात्री सखुबाई बन्सी शिंदे वय 60 वर्षे हिचा घरातून बाहेर फरफटत ओढत घेऊन दगडाने ठेचून खून करण्यात आला व मृतदेह तसाच अस्ताव्यस्त रस्त्याच्या कडेला घराच्या समोर टाकून आरोपीने पलायन केले.
या वेळी आसपास व परिसरातील सर्वांना चौकशी केली असता संशयित आरोपी राजा बन्सी शिंदे वय 35 हा फरार झाला असून राजा उर्फ टूल्या हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सखुबाई ही घरी एकटीच राहत होती दोन्ही मुले कारखाना ऊसतोडीसाठी जात असून मुले सुना कारखान्याला आहेत सखुबाई दोन जनावरे घेऊन गायरानात राहत असे राजा शिंदे उर्फ टूल्या याने सतत भांडणे व दहशत करणे सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले रात्री सखुबाई यांचे डोके पूर्ण दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी फरार झाला.
माहिती मिळताच डीवायएसपी पंकज कुमावत यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे मिसळे तसेच अशोक नामदास मतीन शेख तसेच नांदुर घाट चौकीचे जमादार भालेराव मेसे शेख व कर्मचारी दाखल झाले त्या ठिकाणी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड रक्ताने भरलेले दगड तसेच फरफटत -बाहेर आणलेले रक्ताने भरलेली दोर पोलिसांनी जप्त केले असून पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालय नांदुर घाट येथे शव ठेवण्यात आले उशिरापर्यंत नातेवाईक काही आले नव्हते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!