केज

पैशासाठी विवाहितेचा छळ, केज पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल


केज, दि. 26 (लोकाशा न्यूज) : माहेरवरून घर बांधण्यासाठी पैसे घेऊन ये, तुला मुलबाळ होत नाही या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील देवगाव येथील विवाहितेचा पती केशव महादेव नागरगोजे, सासु सत्यभामा महादेव नागरगोजे, सासरे महादेव भानुदास – नागरगोजे, आरूण महादेव नागरगोजे, जाऊ सोनाली आरून नागरगोजे, छोटा दिर विनोद महादेव नागरगोजे (सर्व रा. देवगाव) केज यांनी जुन 2016 ते दि.24 जानेवारी 2021 रोजी 10 वाजेपर्यंत फिर्यादीचे सासरी देवगाव ता. केज येथे व पुणे येथे संगणमत करून फिर्यादीस तु माहेरहून घर बांघन्यासाठी पैसे घेवुन ये म्हणुन तसेच फिर्यादीवर शक घेवुन, तु चांगली नाहीस, तुला मुलबाळ होत नाही, असे म्हणुन सतत शिवीगाळ करून मारहान करून उपाशिपोटी ठेवुन, घरातील सर्व कामे करून घेवुन मानसिक व शारिरीक छळ करून जाचजुलूम केला व जिवे मारण्याची धमकी देवुन घरातुन हाकलुन दिले. सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व महिला तक्रार निवारण केंद्र यांच्या पत्रावरून वरील सहा जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. नखाते हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!