केज

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर चाळीस वर्षीय नराधमाचा बलात्कार, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या


केज, दि. 24 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यात पारधी समाजातील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस तिच्या घरी सोडतो असे म्हणून मोटार सायकलवर बसवून तिच्या घरी नेऊन एका चाळीस वर्ष वयाच्या नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची चीड आणणारी खळबळजनक घटना घडली आहे. या बाबतची पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, केज पोलीस स्टेशनच्या नांदूरघाट दुरक्षेत्र हद्दतील एका गायरनातील पारधी वस्तीवर आई सोबत राहत असलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अशोक दादाराव थोरात रा. ढाकेफळ ता. केज या ऊस तोड मुकादमाने ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला मोटार सायकलवरून तिच्या घरी सोडतो. असे म्हणून तिला मोटार सायकलवर बसवून तिच्या घरी आणले. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने पाशवी बलात्कार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिली. पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या झालेल्या दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेची माहिती तिच्या आईला सांगितल्या नंतर मुलीच्या आईने केज पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात नराधम अशोक थोरात याच्या विरुद्ध गु र नं 361/2021 भा. दं. वि. 376, 376(2) (1), 506 यासह बाल लैंगिक अन्याय अत्याचार कायदा 2012 कलमचे कलम 3 (2) (5) आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा 4, 6, 8, 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच नराधम अशोक दादाराव थोरात यास ताब्यात घेऊन तात्काळ अटक केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!