केज

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेची दगडाने ठेचून हत्या, केज तालुक्यातील साळेगाव येथील घटनेने जिल्हा हादरलाकेज, दि. 30 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता अज्ञात व्यक्तीने गळा आवळून व डोके दगडाने ठेवून खून केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
अश्‍विनी समाधान इंगळे (वय 28 रा. साळेगाव ता.केज) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वा. अश्विनी इंगळे ही महिला आपल्या दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. त्यावेळी तिचा गळ्यातील स्कार्फने गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. जीवे मारल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह शेजारच्या कापसाच्या शेतात टाकला, मृतदेहाच्या  अंगावरील साडी बाजूला पडलेली आढळून आली, तसेच डोक्यात घातलेला दगड, स्कार्फही मिळून आले, तर मृतदेहापासून काही अंतरावर वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायतील एक बूट व दुसरा काही अंतरवावर कानातील एक दागिना हेअर पिन ह्या वस्तू मिळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!