देश विदेश क्राईम

हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक! थेट राष्ट्रपतींना साकडे

​मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेनंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली असून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साकडे घातले आहे.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेची माहिती गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना पत्राद्वारे दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणलं आहे. या भयंकर घटनेमुळं देशभरात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळं या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत,’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींकडे सहा मागण्या केल्या आहेत.

​शिवसेनेच्या सहा मागण्या पुढीलप्रमाणे…

> आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन दिला जाऊ नये
> या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीसाठी अनुभवी व कार्यक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.
> या प्रकरणात पुरेशे आणि योग्य पुरावे सादर केले जावेत.
> साक्षीदारांना पोलिसांकडून पूर्ण सुरक्षा दिली जावी.
> या प्रकरणी न्यायालयात वेळीच आरोपपत्र दाखल केले जावे.
> आरोपींना फाशी व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या वकिलांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत द्यावी.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!