क्राईम बीड

नारायणगड एसटीचे अज्ञात चोरट्यांनी केले डिझेल चोरी

पैठण आगारातील होती एसटी तब्बल दोनशे लीटर डिझेल चोरी

कोळगाव, दि.२२) – बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले श्री क्षेत्र नारायणगड संस्थांना वरील पैठण आगारातील मुक्कामी उभ्या असलेल्या एटीएस चे अज्ञात चोरट्यांनी २०० लीटर डिझेल अठरा हजार रुपयांचे डिझेल चोरी गेले. ही घटना दि.२१ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. गुन्हा नोंद करण्यात आला.
बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हनून ओळखले जाणारे श्री क्षेत्र नारायणगड (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे नेहमीच भाविक भक्तांची गर्दी असते. भक्तांच्या सोयीसाठी गडावर जाण्यासाठी येण्यासाठी एस टी महामंडळाच्या माध्यमातून बससेवा सुरू आहे. सध्या नारायणगडावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील बीड जिल्ह्यासह अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा पैठण, गेवराई आगाराच्या वतीने बससेवा सुरू असून मुक्कामी असतात. गडावर भक्तांची सोय होते. दरम्यान पैठण येथील मुक्कामी उभ्या असलेल्या एम एच-२० बीएल ११६४ ह्या गाडीमधून दि.२१ जानेवारी रोजीच्या रात्रीच्या सुमारास एटीएस चे अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरी केले. या शाबुलाल शेख यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.२२ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पोलीस दादासाहेब सानप करत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!