बीड क्राईम

सीएस डॉ.बडेंचा दणका ; गेवराईतील अवैध गर्भपात सेंटर केले उध्वस्त

किरायाच्या घरात केले जात होते गर्भपात : सोनोग्राफी मशीन सह चार जण ताब्यात

गेवराई :- शहरातील संजय नगर परिसरात एका किरायच्या घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे व त्यांच्या टिमने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला तसेच या कार्यवाईत गर्भपात करनारी सामग्री व विविध मशीन सह मालकाला व एक महिला हीला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैधकीय अधिक्षक यांच्याकडे प्राप्त झाली त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? याबाबद बीड जिल्हा शैल्यचिकीत्सक यांनी डमी महिला तयार करून सदर फोन करूण याची पुष्टी केली तसेच या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखा व वैधकीय पथक यांनी सदर ठिकाणी ( दि 4 रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला व याठिकाणी एक महिला व घरमालक त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे तसेच याठिकाणाहून सोनाग्राफी मशीन व गर्भपात करनारी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाई सूरु असुन आरोपी महिला ही नर्स असुन तिच्यावर काही महिण्यापुर्वी असा गुन्ह्यासंदर्भात कार्यवाई करण्यात आली होती जामिनवर सुटल्यानंतर तिने हा व्यावसाय परत सुरू केला असल्याचे समजले तसेच मनिषा सानप व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कार्यवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनी सुरेखा धस विधी अधीक्षक मोहम्मद नोमानी, डॉ.रांदड, डॉ.राजेश शिंदे सह अन्यजन या कार्यवाईत सहभागी होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!