देश विदेश

ब्रेकिंग न्यूज : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष

[Babri Masjid, Faizabad]; Unknown; about 1863–1887; Albumen silver print; 15.2 × 20.9 cm (6 × 8 1/4 in.); 84.XA.417.32; No Copyright - United States (http://rightsstatements.org/vocab/NoC-US/1.0/)


अयोध्या, दि.30 :
1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे.

32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित
न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होते. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!