देश विदेश राजकारण

द्रौपदी मुर्मू बनल्या भारताच्या महामहीम:सरन्यायधीश रामण्णा यांनी दिली राष्ट्रपतिपदाची शपथ..

देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 10.15 वाजता घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

हे माझे सौभाग्य
​​​​राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे.

हीच लोकशाहीची ताकद
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!