महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीतील हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल.
सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना मंत्रीपद दिलं. पण ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नरहरी झिरवळ चर्चेत होते. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे , हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!