बीड राजकारण

पंकजाताई मुंडेना उमेदवारी न दिल्याने भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्षपदाचा फयाज शेख यांना दिला राजीनामा

शिरुर कासारः- स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षात काम करत असताना कसलाही स्वार्थ न ठेवता जबाबदारीने काम केले. अल्पसंख्यांक समाजाला पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अनेक वर्षापासून मी करत आहे. आमच्या नेत्या मा.पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षाने विधान परिषदेवर उमेदवारी देऊन आमदार करावे अशी आमच्या सर्वांची अपेक्षा व इच्छा होती. मात्र भाजपा पक्षाकडून त्यांना वेळोवेळी डावलण्याचे कटकारस्थान कारस्थान केले जात असल्याने माझी पक्ष नेत्यांवर नाराजी आहे. बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री मुंडे यांच्या सारख्या लोकनेत्यांना जर पक्षात दुर्लक्षित केले जात असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षात कुठल्या अपेक्षेने काम करावे असा प्रश्न आम्हाला पडला आहे.भाजपा पक्षाकडून ओबीसी,अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत असल्याची माझी वयक्तिक भावना आहे. पक्षातील निष्ठावान,सच्चा कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून आयाराम-गयाराम लोकांना मानाची पदे देण्याचं काम होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.भाजपा पक्षाच्या या भूमिकेने मी व माझ्या बरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते व्यथित असल्याने भविष्यात पक्षासाठी काम न करण्याची आमची मानसिकता झाली आहे.त्यामुळे मी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा तालुकाध्यक्ष व बूथ प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. अश्या आशयाचे पत्रक भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शिरूर कासार तालुका अध्यक्ष फय्याजभाई शेख यांनी काढले आहे. त्यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे शिरूरकासार तालुकाध्यक्ष डॉ.मधुसूदन खेडकर यांच्याकडे दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!