क्राईम महाराष्ट्र

विहीर खोदतांना जिलेटीनचा स्फोट; तीन मजूर ठार

विहीर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनचा भिषण स्फोट झाल्याने तीन मजूर जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीनही मजूर हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत.
नाशिकच्या हरसूलमधील रिवडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी रात्री 8.30 वाजता अचानक जिलेटीनचा भीषण स्फोट झाला. यात दोन मजूर बाहेर फेकले गेले. तर एक मजूर विहिरी दबला गेला. तिन्ही मजूरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये लहू महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावे आहेत. ते बीड जिल्ह्यातीला अष्टी तालुक्यातीला आहेत. घटना घडल्यानंतर हरसुल् पोलीस स्टेशनचे पीआय् बोडके घटनास्थळी दाखल झाले आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!