गेवराई

मादळमोहीत गुटखा पकडला

गुटख्याची साठेबाजी करणार्‍यांचे धाबे दणाणले


गेवराई : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील माऊली ट्रेडर्स च्या पाठीमागच्या घरात विविध कंपनीचा 63 हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न प्रशासन अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. यामुळे तालुक्यातील गुटखा बहाद्दरामध्ये खळबळ उडाली आहे.

मादळमोही येथे गावात माऊली ट्रेडर्स हे दुकान आहे. या ट्रेडर्स च्या पाठीमागच्या एका खोलीत बाबा, हिरा सह आदि कंपनीचा गुटखा असल्याची माहिती अन्न सुरक्षा प्रशासनाला मिळाली होती. दरम्यान या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी छापा टाकला. यावेळी माऊली ट्रेडर्स च्या पाठीमागे असलेल्या घरातील खोलीत गुटख्याचा साठा विक्री साठी ठेवलेला आढळून आला होता. यावेळी 63 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, ऋषीकेश मरेवार सह आदिंच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी दुधाळ यांच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे गुटख्याची साठेबाजी करणार्‍याचे धाबे दणाणले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!