बीड

श्री क्षेत्र नारायण गडासाठी २४ कोटीचा तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर; गडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्याकडे शासन निर्णय सुपूर्द

श्री.क्षेत्र नारायणगडासाठी आलेल्या निधीसाठी कोणत्याही क्षीरसागरांचा योगदान नाही :- अनिल जगताप , सचिन मुळूक

बीड, दि.17 (लोकाशा न्यूज) : धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथील विकास व्हावा, अशी भक्तांची मागणी होती. या मागणीच्या पाठपुराव्यानंतर आता २४ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास दि.१५ मार्च रोजी सुधारित प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता नारायण गडाचा कायापालट होणार आहे.
सन २०१८ मध्ये स्व.विनायक मेटे यांनी पुढाकार घेवून धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथील विकास कामात लक्ष घातले . तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात त्याच काळात २५ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंजूरी दिली आणि अडीच कोटी रूपयांचा निधी देखील वर्ग केला. पुढे सरकारमध्ये बदल झाला आणि मंजूर आराखड्यास निधी मिळालेला नाही. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमूख सचिन मुळूक, गडाचे विश्वस्त अनिल जगताप, विश्वस्त बळीराम गवते, बी.बी.जाधव, गोवर्धन काशीद आणि सर्वच मंडळींनी नारायण गडचे महंत शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मागील काही महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर दि.१५ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पालकमंत्री धनंजय मुंडे ,गिरीश महाजन, यांच्या माध्यमातून या आराखड्यात सुधारित मान्यता देण्यात आली यासाठी आमदार लक्ष्मण पवार तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचं मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, धाकटी पंढरी नगदनारायण गडाच्या विकास कामासाठी निधी उपलब्धतेचा अद्यादेश शनिवारी दुपारी गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमूख विश्वस्त अनिल जगताप,शिवसेना जिल्हाप्रमूख सचिन मूळूक, बळीराम गवते, गोवर्धन काशिद, यांच्यासह सुनिल अनभुले, भागवत मस्के, अमोल पवार, सचिन घरत, फैयाज पठाण उपस्थित होते.


१७ कामांचा आहे समावेश
मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम, प्रवेशद्वारावर सुंदर असे वास्तुशिल्प चारही दिशांना, लँडस्केप, सार्वजनीक शौचालय, पाणी व जलव्यवस्थापनात पाण्याची टाकी, पाईपलाईन व उपांग दुरूस्तीची कामे, जलसंवर्धन कामे, वाहनतळ, सिंमेट काँक्रिट वाहनतळ, बस स्टँड, दोन प्रसादालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन. इत्यादी महत्त्वाची कामे होणार असून या कामी मनोज जरांगे पाटील यांनीही गडाच्या निधीसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता.

—-
मागील काही महिन्यांपासून मी व विश्वस्त नारायणगडच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे व गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. यासाठी आमदार लक्ष्मण पवार तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचे सहकार्य लाभले. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नारायणगडासाठी निधी उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वांचे आभार . तसेच श्री क्षेत्र नारायण गडाला आलेल्या निधीमध्ये कोणत्याही क्षीरसागरां चे योगदान नाही विनाकारण कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये
अनिल जगताप – सचिन मुळूक, जिल्हाप्रमूख, शिवसेना.
—-
श्री.क्षेत्र नगद नारायण गडाचा विकास करण्यासाठी गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विश्वस्त आणि सचिन मुळूक सर्वजण एकत्रित पाठपुरावा करत आहोत. नारायण गडच्या विकासासाठी २४ कोटी रूपये मिळत असूून त्यातून मोठे काम मार्गी लागेल, ही भक्त म्हणून भावना आणि समाधान आहे.
-बळीराम गवते, विश्वस्त, नारायण गड.
—-

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!