क्राईम गेवराई

त्या अपहरण प्रकरणी चार आरोपींना ठोकल्या बेड्या; चकलांबा पोलिसांची विशेष कारवाई 

कोळगाव, दि.३० – गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जेसीबी पोकलेन व्यवसाय असणारे उद्योजक कैलास शिंगटे यांचे दि.२६ जानेवारी रोजी अचानक अपहरण करुन ०२ कोटींची खंडणी मागणाऱ्या ०४ आरोपींना चकलांबा पोलिसांनी अटक केली आहे. अपहरणा दरम्यान आरोपींनी कैलास शिंगटे पैसे देण्यास नकार दिला म्हणून  जबर मारहाण अज्ञान ठिकाणी जखमी अवस्थेत गाडीतून टाकून दिले होते. दरम्यान या प्रकरणाची गुंतागुंत पाहता चकलांबा पोलिस ठाण्याचे एपीआय भास्कर नवले यांनी तातडीने पथके स्थापन करून तपास कार्य सुरू केले होते. घटनेच्या चौथ्या दिवशी चार आरोपींना बेड्या ठोकू ताब्यात घेत हा गुन्हा उघडकीस आला. या कारवाईची चर्चा होत आहे.गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ येथे कैलास शिंगटे यांचे टायर्रचे दुकान आहे. ते दि.२६ जानेवारी २०२२ रोजी साठेवाडी फाटा येथून  जात असताना त्यांच्या मोटारसायकल गाडीला पाठिमागून जोरांची धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या तोंडात बोळा टाकून दोन कोटी रुपये खंडणीची अपहरणकर्त्यांनी मागणी केली. दोन कोटी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना अमानूष मारहाण करत, दाभणाने शरीरावर छीद्रे पाडली. 
जीवे मारण्याचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली. पण अचानक गाडी बंद पडली. आणि खंडणीखोर यांनी पलायन केले. यादरम्यान त्यांच्या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक -२४/२०२२ भादवि ४६४अ ४६५ नूसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  या घटनेमुळे परिसरातील सर्व सामान्य जनतेत आणि व्यापारी दुकानदार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आर्थिक व्यवहार देवाण घेवाण करताना गुन्हेगारीच्या आणि राजकीय घडामोडी नेहमीच होत असतात. पण याचबरोबर उद्योगधंद्याला आणि व्यापार लोकाला राजकीय लोकांकडून तसेच गुंडा कडून अवैद्य धंदे वाल्याकडून  मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने मादळमोहीतील जनतेनी एकत्र येऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी म्हणून लेख निवेदन देण्यात आले. दरम्यान या प्रकरणाची गुंतागुंत पाहता चकलांबा पोलिस ठाण्याचे एपीआय भास्कर नवले यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने पथके स्थापन करून तपास कार्य सुरू केले होते. घटनेच्या काही वेळातच आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आला. 

तपासासाठी पथके तैनात केली-  एपीआय भास्कर नवले
सिनेस्टाईल शिंगटे यांचे अपहरण करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून  या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीच्या तपासासाठी चकलांबा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एपीआय भास्कर नवले यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तैनात करण्यात आली होती.  डीवाय एसपी यांनी भेट देऊन सुचना दिल्या. तसेच एलसीबीचे पीएसआय श्री. डुलत यांचेही एक पथक ही आरोपीच्या तपासासाठी कामावर होते. दि.२९ जानेवारी २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास अहमदनगर येथून चकलांबा पोलिसांच्या पथकातील पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या, असून दोन आरोपी फरार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर  अटक केलेले आरोपी दि.३० जानेवारी रोजी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची म्हणजे दि.०२ फेब्रुवारी रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे. असे चकलांबा पोलीस ठाण्याचे एपीआय – भास्कर नवले यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!