बीड

यंदा बीड झेडपी लागवड करणार साठ लाख वृक्ष, सीईओंनी ‘एक व्यक्ती तीन झाडे’ चा कृती कार्यक्रम आखला,उत्कृष्ट काम करणार्‍या पंचायतींना पुरस्कार तर हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळणार कारवाईचे नारळ


बीड, दि. 28(लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेने यंदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात 60 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आखले आहे. ‘एक व्यक्ती तीन झाडे’ असा हा कृती कार्यक्रम आहे. यामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या पंचायतींना पुरस्कार दिला जाणार आहे. तर दुसर्‍या बाजूने या कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना कारवाईचे नारळ मिळणार आहे. शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सीईओ अजित कुंभार यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार अधिकारीही आता कामाला लागले आहेत.
दिवसेंदिवस कमी होत जाणारे झाडांचे प्रमाण व परिणामी त्याचा जैविक विविधतेवर होणारा दुष्परिणाम, अशुध्द हवा यामुळे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून वातावरणातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी सन 2021 चे पावसाळयात 01 व्यक्ती 03 झाडे प्रमाणे वृक्षलागवड करुन जोपासना करण्याचे आवाहन केलेले आहे. वृक्षलागवड 2021 या उपक्रमास गती देण्यासाठी बीड जिल्हा परिषदने एक कृति कार्यक्रम तयार केला असून सर्व ग्रामपंचायत निहाय लाववयाच्या रोपांचे स्थळ निश्चिती करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात सुमारे 2009826 लक्ष लोकसंख्या असून सुमारे 60 लक्ष ( 6029479 ) रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान 1 घनदाट वृक्षलागवड जागा व पाणी यांचे उपलब्धतेनुसार करण्यात येणार आहे. दि. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असून या दिवशी वृक्षलागवड 2021 चा शुभारंभ करण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान 100 वृक्षाचे वृक्षारोपन या दिवशी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गती देण्यासाठी व वृक्ष संगोपनामध्ये सातत्य राहण्यासाठी 05 ग्रामपंचायतीसाठी 01 संपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार असून दर आठवाडयास आढावा घेतला जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावरुन प्रत्येक तालुक्यासाठी 01 संपर्क अधिकारी ( वर्ग 1 दर्जाचा ) नियुक्त केला जाणार असून त्यांचे मार्फत मा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थेट अहवाल सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमास गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी शुक्रवारी जिल्हातील सर्व गट विकास अधिकारी , विस्तार अधिकारी ( पं ) यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन कार्यक्षम अंमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या आहे. तसेच वृक्षलागवड -2021 मध्ये उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायतीना व पंचायत समितींना परितोषीक देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणारे कर्मचारी, अधिकार्‍यांना शास्ती देण्याबाबतची कारवाई पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नोडल अधिकारी म्हणून डेप्टी सीईओ गिरींवर
टाकली जबाबदारी
सदर उपक्रमासाठी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी जिल्हा परिषद स्तरावर नोडल अधिकारी म्हणून गिरी डी.बी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं. ) जिल्हा परिषद , बीड यांची नियुक्ती केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!