बीड अंबाजोगाई

रुग्णसंख्येचा आलेख घसरताच डॉक्टरांनी पीपीई किट घालून केला डान्स

अंबाजोगाई – दररोजची वाढती रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण यामुळे आरोग्य कर्मचारी हैराण झाले होते .मात्र गेल्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य कर्मचारी आणि महिला डॉक्टरांनी पीपीई किट घालून गाण्यावर ठेका धरत आनंद साजरा केला .
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली. अनेक डॉक्टर आणि नर्स यांना अठरा-आठरा तास काम करावे लागत आहे. मात्र आता अंबेजोगाई येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहेत. 10 दिवसापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र ती संख्या आता 50 हून कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मागील महिनाभरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!