महाराष्ट्र

CBSE बोर्डाची 12 वीची परीक्षा केवळ 30 मिनिटांचीच होणार; 1 जूनला तारखा ठरणार

​कोरोना महामारीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालाकांमध्ये सीबीएसईच्या 12 वीची परीक्षा होणार की नाही, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे 1 जूनला 12 वी परिक्षेच्या तारखांची घोषणा करणार आहेत.​ यामध्ये परीक्षेचा वेळ हा दीड तासांनी कमी करून अर्धा तास केला जाऊ शकतो. सुत्रांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार या परिक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाणार आहेत. रविवारी झालेल्या राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकींतर शिक्षण मंत्रालयाने केंद्राच्या प्रस्तावावर लिखीत मत मागितले होते. यावेळी 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी  12 वीची परीक्षा आयोजित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. ​ ​मात्र, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि अंदमान निकोबारनी परीक्षा न घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच परिक्षेआधी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली होती. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मंडळाने आता या विद्यार्थ्यांसाठी गुणवाटपाची पद्धत जाहीर केली आहे. गुणवाटपाची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल २० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शाळांना नेहमीप्रमाणे प्रत्येक विषयासाठी २० गुण इंटरनल असेसमेंटच्या स्वरूपात द्यायचे आहेत. तर ८० गुणांचे वाटप हे वर्षभरात शाळेने घेतलेल्या विविध चाचणी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे द्यायचे आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!