बीड

उपचारात रूग्णांवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत खा. प्रीतमताई रूग्णांसोबत, आष्टी, पाटोदा अन् शिरूरच्या कोविड वार्डात जाताच आरोग्य यंत्रणा रूग्णांच्या सेवेत झाली सतर्क


आष्टी,पाटोदा, शिरूर, दि. 16 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटरमध्ये जावून खा. प्रीतमताई रूग्णांशी संवाद साधत आहेत. यामुळे रूग्णांना मोठा आधार मिळत आहे. त्यांच्या याच भेटीने आरोग्य यंत्रणानाही आता चांगलीच सतर्क झाली आहे. उपचारात एखाद्या रूग्णांवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच खा. प्रीतमताईंनी यावेळी संबंधित यंत्रणेला आणि सत्ताधार्‍यांना दिला आहे. त्यामुळे सगळीच आरोग्य यंत्रणाला गतीने कामाला लागली आहे.

शुक्रवारी त्यांनी पाटोदा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच कोविड सेंटरमधील स्वयंपाक गृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच आष्टी शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना भेटून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या, कोरोनाच्या नवीन लक्षणांमुळे प्रादुर्भाव वाढत आहे, नागरीकांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन करावे व खबरदारी घ्यावी, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. येथील कोविड केअर सेंटरलाही ताईंनी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच उपचारार्थी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. रुग्ण संख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर तणाव निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे हाच एक उपाय आहे, त्यासाठी सर्वांनी मास्क,सॅनिटायजर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे गेली तीन दिवस जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर्सला भेटी देत आहेत.आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांनी तीनही तालुक्यातील रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.तसेच रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची आस्थेवाईकपणे चौकशी देखील केली. आरोग्य व्यवस्थेवर वाढलेल्या तणावामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही अशा सूचना देताना ठिकठिकाणी त्यांनी सोयीसुविधा आणि उपलब्ध औषधी,बेड्सची माहिती घेतली.तसेच अँटीजण टेस्ट कॅम्प राबवताना कोरोनाच्या बदलत्या लक्षणांची माहिती देण्याचे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले.

कोरोनाच्या बदलत्या लक्षणांमुळे
प्रादुर्भाव वाढला, प्रभावी जनजागृती करा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांमध्ये नवीन लक्षण आढळत आहेत,बदलत्या लक्षणांमुळे रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून रुग्णसंख्या कमी करायची असेल तर नागरीकांना नव्या लक्षणांची माहिती असणे आवश्यक आहे.त्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने प्रभावी जनजागृती करावी अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केल्या आहेत.

अन रुग्णांमध्ये निर्माण झाला आत्मविश्वास
शिरूर येथील कोविड रुग्णालयाला भेट दिल्यानंतर खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रुग्णांशी संवाद साधला.आपल्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी खासदार ताई थेट कोविड कशात आल्याचे पाहून रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र बघण्यात आले.तसेच पाटोदा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी स्वयंपाक गृहाची पाहणी केली व रुग्णाच्या तक्रारीचे तात्काळ निवारण केले.आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खासदार ताई स्वयंपाक गृहात गेल्याचे बघून रुग्णही आश्वस्त झाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!