केज

कामाचा दर्जा सुधारा, केज मतदार संघातील रस्त्याच्या कामांची आ. नमिता मुंदडांनी केली पाहणी

मतदारसंघातील रस्ते कामांची आ. नमिता मुंदडांनी केली पाहणी

कामाचा दर्जा सुधारण्याच्या केल्या सूचना

केज : केज विधान सभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी बुधवारी (दि.२४) मतदार संघातील रस्ते आणि पुलाच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी आ. मुंदडा यांनी कामाचा दर्जा सुधारण्याबाबत कंत्राटदारास सूचना केल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केज तालुक्यातील लहुरी – कानडी माळी रस्त्याचे काम सुरु आहे. या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, येवता गावाजवळील पुलाचे ही काम प्रगतीपथावर असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. आ. नमिता मुंदडा यांनी बुधवारी दोन्ही कामांची पाहणी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी बांधकाम विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार उपस्थित होते. स्वतः वास्तुविशारद असलेल्या आ. मुंदडा यांनी या कामातील कमतरता अचूक हेरल्या. कामावर बारकाईने लक्ष देण्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. तर, कामाचा दर्जा सुधारावा आणि वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी कंत्राटदाराला केल्या. दोन्ही कामाबाबत आसपासच्या ग्रामस्थांच्या तक्रार नाही आल्या पाहिजेत अशी तंबीही त्यांनी दिली. आमदारांच्या अचानक भेटीने अधिकारी आणि कंत्राटदाराची तारांबळ उडाली होती. लहुरी, कानडी माळी, येवता ग्रामस्थांनी मात्र आ. मुंदडा यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!