बीड

खा.प्रीतमताईंनी दाखवलेल्या आपुलकीने ‘त्या’ ऊसतोड कामगाराचे कुटूंबिय गहिवरले, रात्री बारा वाजता आलेल्या फोनला प्रतिसाद देत आपघातात जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या ऑपरेशनची केली व्यवस्था


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई मुंडेंची तत्परता आज जिल्ह्यासह राज्यातील गोरगरिबांसाठी मोठा आधार देणारी ठरत आहे. रात्री बाराच्या सुमारास आलेल्या फोनला प्रतिसाद देत आपघातात जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या ऑपरेशनची व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांनी दाखविलेल्या याच आपुलकीने ‘त्या’ ऊसतोड कामगाराचे कुटूंबिय आक्षरक्ष: गहिवरून गेले आहेत.
  ऊसतोड कामगार धम्मदीप अशोक सोनवणे (रा. नंदपुर कांबी ता. गेवराई) यांचा मुलगा कर्नाटकातील मनाली मलगड साखर कारखाना, या ठिकाणी ऊसतोडणीसाठी गेलेले असताना मागच्या पंधरा दिवसांपूर्वी त्याला एसटी बसने उडवलं होतं. पंधरा दिवसांपासून विजापूर (कर्नाटक) याठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे,   दररोज 10 ते 15 हजार रुपये खर्च लागत होता, आतापर्यंत दिड लाखांहून अधिक खर्च झालेला होता. पैशाअभावी त्या मुलाचा पुढील उपचार त्या ठिकाणच्या डॉक्टरने थांबवले होते, अक्षरशः त्या मुलाच्या आई-वडील त्याठिकाणी उपाशी होते, अशावेळी त्या ऊसतोड कामगार सोनवणे यांनी बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना रात्री 12 वाजता फोन करून संपूर्ण व्यथा सांगितली. खा. प्रितमताईंनी लगेच कृष्णा तिडके लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार व मुकदम वाहातुकदार संघटना जिल्हाध्यक्ष बीड व कारखान्याशी संपर्क साधला व त्यांना संपुर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या व संपूर्ण  हॉस्पिटल बिल भरण्याची व्यवस्था केली. कामगारांच्या कुटुंबाचा विमा भरलेला असल्याची व त्याची संपूर्ण प्रोसेस करून त्यांना आर्थिक मदत मिळवून कशी देता याचीही व्यवस्था केली. तुम्ही कुठलीही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे असे त्या अपघातग्रस्त उसतोड कुटुंबाला ताईंनी सांगितले, तेव्हा त्यांना गहिवरून आले व त्यांनी सुटकेचा निश्वास टाकत आसवांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या डोळ्यातून उसतोड कामगारांच्या वारसावरील विश्वास व्यक्त होत होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!