महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत, RTIमधून मोठा खुलासा

मुंबई, 14 डिसेंबर: राज्यात आर्थिक चणचण भासत असली तरी मंत्र्यासाठी सरकारची तिजोरी खुली आहे. मंत्र्यांनी आपल्या बंगल्यासाठी थोडे थाकडे नाही तर तब्बल 90 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. त्यात माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीत एक मोठा खुलासा समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (CM Udhav thackeray) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सरकारी बंगलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) डिफॉल्टरच्या यादीत टाकला आहे.

सामान्य मुंबईकर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका तुमची जलजोडणी खंडित करते, परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर महेरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी आहे. तसेच सदर बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.
आरटीआय (RTI) कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळवर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे होती. यामाहितीत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 थकबाकी आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राउत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाला थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट), राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहचे नावे आहेत.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनते का भरावे ? तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या आवासवर किती पाण्याची थकबाकी?

1.उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री- वर्षा- एकूण थकबाकी 24916/-

 1. अजित पवार, वित्तमंत्री- देवगिरी-एकूण थकबाकी 84224/-
 2. जयंत पाटील- सेवासदन- एकूण थकबाकी-115288/-
 3. नितीन राउत, उर्जा मंत्री-पर्णकुटी-एकूण थकबाकी-115288/-
 4. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, -रॉयलस्टोन-एकूण थकबाकी-12809/-
 5. अशोक चव्हाण-मेघदूत-एकूण थकबाकी-111005/-
 6. सुभाष देसाई, उद्योगमंत्री-पुरातन-एकूण थकबाकी-50120/-
 7. दिलीप वळसे पाटील- शिवगिरी- एकूण थकबाकी-5756/-
 8. एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)-नंदनवन-एकूण थकबाकी-119524/-
 9. राजेश टोपे,-जेतवन- एकूण थकबाकी-6703/-
 10. नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष, -चित्रकुट-एकूण थकबाकी-83514/-
 11. राजेंद्र शिंगे, सातपुडा-एकूण थकबाकी- 23746/-
 12. नवाब मलिक, मुक्तागीरी- एकूण थकबाकी-30102/-
 13. छगनराव भुजबळ- रामटेक-एकूण थकबाकी-39939/-
 14. रामराजा निंबाळकर, विधान सभापती-अजंठा-एकूण थकबाकी-128797/-
  16-देवेंद्र फडणवीस-सागर-एकूण थकबाकी-111550/-
 15. सह्याद्री अतिथीगृह- एकूण थकबाकी-640523/-

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..
बंगल्यावर खर्च केला पाहिजे पण आधी सरकारने शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजे.  मंत्र्यांचे बंगल्याच्या पाणी बिल भरण्याचा काम शासकीय आहे, ज्या अधिकारी यांनी दिरंगाई केली असेल त्याच्यावर कारवाई करा, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!