महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराची मुलगी ठार

करमाळा, दि. 7 डिसेंबर :
करमाळा तालुक्यात बिबट्याचे हल्ले अजून चालूच असून ऊसतोडणी कामगारांच्या नऊ वर्षाच्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न चिखलठाण येथे केडगाव शेटफळ सीमेवरती राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास केला.ऊसतोडणी कामगारांची टोळी मधील नऊ वर्षाची मुलगी बिबट्याने पकडली होती. बिबट्याच्या तावडीतुन सुटका केली. तिला करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला .
करमाळा तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आता पर्यत बिबट्याने प्रत्येक दुसऱ्या दिवशी हल्ला केला आहे. लिंबेवाडी अंजनडोह नंतर आता चिखलठाण परिसरात बिबट्याचा वावर हा स्पष्ट दिसून येत आहे. याठिकाणी आठ ते नऊ वर्षाच्या उस टोळीतील लहान मुलीला बिबट्याने उचलून नेले. प्रयत्न केला या झटापटीत तिला त्यांनी ओढत उसाच्या शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर जखमी केले. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
फुलबाई अरचंद कोडली असे या मृत मुलीचे नाव असून ती दुसाने तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे.ऊसतोडणी चालू असताना ती इतर मुलीबरोबर खेळत होती .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!