बीड

चर्‍हाटा येथे महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला


बीड, दि.2 (लोकाशा न्युज) ः शहरापासून जवळच असलेल्या चर्‍हाटा येथे माने नामक महिलेवर वन्य प्राण्याने हल्ला चढवला असून जखमी झालेल्या महिलेला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून त्या बेशुध्द अवस्थेत असल्याने हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून पथक लवकरच घटनास्थळी दाखल होत आहे. हल्ला केलेल्या परिसरात उमटलेल्या प्राण्याच्या पायाच्या ठसाची तपासणी केल्यानंतर हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे समजू शकेल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!